कृतज्ञता
कुणी कधी अन कसे कुणास्तव,
काय करील कळत नाही
कार्य करुनही कष्ट कुणाचे
कसे कुणाला कळत नाही
कृतज्ञतेस्तव कसे कुणाला
काय म्हणावे कळत नाही
करीता करीता किती कुणी
कोणास द्यावे....माप नाही
करण्याऱ्याने करीत रहावे
कृतीस त्याच्या काप नाही
हात पसरूनी घेतो जो तो
देणे घेणे शाप नाही
लुटावयासी वृत्ती पाहिजे
क्षुद्र मनाची टाप नाही
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home