Sunday, 13 June 2021

अनुबंध

कल्पना तुझिया मनातील 
कां थांबल्या ओठांवरी 
सांग ना मनीचे.... तुझ्या गं
कां अशी तू बावरी
ओळखावे मीच सारे 
कां धरावा ध्यास तू 
ओळखूनी मी तरी तू
मग अचानक गप्प व्हावे 
खेळ हा खेवू किती 
मजला आता ना साहवे
स्पष्ट शब्दातून मजला
 प्रेम ते तुझिये हवे 
रोम रोमातून जरिही 
शब्द तो घुमतो कसा 
व्यक्त तू केल्याविना 
मी सांग तो उचलू कसा 
माझे असे जे सर्वकाही 
देईन मी ओसंडूनी 
ना तरी मागेन कांही 
वचन घे हे मांडूनी 
आज तू मजल पुसावे 
आणि मी होकार द्यावा 
नेत्रां चिया क्या मैफिलीचा
 हा असा अनुबंध व्हावा 
सांगना करशील का 
इतुकेची तू धैर्यासवे
आतूर मी येण्यास गं 
सर्वोपरी तुझियासवे
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home