यती
शुष्क पर्णे वाजती
चरचरा चरचरा पायातळी
उग्र रूप देखोनी ते
सर्द झाल्या कातळी
घोर तप केला तयाने
सर्व जाणिती तो यती
त्यजुनि सर्वस्व अपुले
ध्वस्त केली नीयती
कंटकांची करुनी शय्या
निद्रिस्त तो होई असा
शयनगारातील मंचक
मऊ मुलायम तो जसा
स्थैर्य ना विश्रांती त्याला
भटकतो रानांतरी
आस कैची ते कळेना
'सुप्त' त्याच्या अंतरी
कर्मयोगाच्या बळाने
आदर्श जो निर्माण केला
आठवा प्रत्येक जनहो
संदेश जो देवून गेला
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home