Friday, 1 April 2022

यक्षप्रश्न

काश्मीर की नंदनवन, नंदनवन की काश्मीर?
बालपणापासूनच्या सर्व स्मृति ह्या प्रश्नासोबत जाग्या झाल्या आणि माझ्या मस्तकातील मेंदूला गदगदा हालवायला लागल्या. ज्या इंग्रजी टेक्स्ट बुकातून हा धडा शिकवला गेला ते टेक्स्ट बुक आता काळाआड गेलंय ह्याचं स्मरण झालं अन् नकळत दोन खारावलेले थेंब गालांना ओरबाडून खाली पडले आणि क्षणांत मातीत मिसळून गेले. 
हं...... फार पूर्वी नाही तर साधारण पन्नास एक वर्षे लोटली असतील ह्या वस्तू स्थितीचा अनुभव सगळं जग करीत होते आणि कश्मिरी रहिवासी सुद्धा इतरेजनांना मोठ्या अभिमानाने सांगत असत की पृथ्वी वर जर कोठे स्वर्ग आहे तर तो येथे काश्मीरातच आहे. 
स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात अनेक राजे रजवाडे अस्तित्वात होते आणि एकसंध भारत अशी भौगोलिक संरचना देखील नव्हती. मोंगली शासकांच्या काळात एकछत्री अंमल कुणाचाच नव्हता आणि अशा परिस्थितीत येथे भारत किंवा हिंदुस्थान ही एक सांस्कृतिक संकल्पना तेवढी ज्ञात होती किंवा मानल्या जायची. पुढे इंग्रजी सत्तेला संपूर्ण भारतभर एकछत्री राज्य स्थापन करण्यात यश प्राप्त झाले आणि त्यातूनच वर्तमान भारतीय संघराज्याला बळकटी मिळाली. त्याही परिस्थितीत काश्मीर हे स्वतंत्र राज्य म्हणून आपलं अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्नशील होतं, काश्मीर चे राजे हरिसिंग यांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. परंतु, प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी अखंड भारताच्या संकल्पनेला सुरुंग लावून मुसलमानांना त्यांच्या धर्माचा आधार देऊन पाकीस्तानची निर्मिती घडवून आणली. झाले इंग्रज भारत सोडून जाताहेत हे बघून आसुरी मुसलमानी प्रवृत्तिंनी काश्मीरचा घास घ्यायचे ठरविले. कबायलींचे हल्ले यशस्वी होतात हे पाकिस्तानी शासनाने जाणले आणि त्या हल्ल्यांना समर्थन आणि पर्यायाने काश्मीर चा ताबा मिळवता यावा यासाठी छुपी सेना कबायल्यांच्या सोबत काश्मीरात घुसवली. हे लक्षात येताच महाराजा हरीसिंगाला भारतात विलीन होणे आवश्यक वाटले आणि त्या अनुषंगाने भारतीय सैन्याने कबायल्यांचा फडशा पाडत काश्मीरचे भारतात विलीनीकरण घडवून आणले. परंतु येथेही
इंग्रजी सत्तेच्या हातातील कठपुतळ्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती करीत त्यांचा अनुनय करण्यात धन्यता मानली आणि इंग्रजांनी सुचविलेल्या शिफारशी अमलात आणून काश्मीरचा मोठा भूभाग पाकड्यांना घशात घालण्यासाठी सोडून दिला. मुळातच मुस्लिम बहुल ह्या प्रदेशात पाकिस्तानी कारवायांना प्रतिसाद मिळत गेला आणि हां हां म्हणता येथे पुन्हा एकदा काश्मीरला भारतापासून विभक्त करण्याचे मनसुबे जोर धरू लागले. अकर्मण्यतेची मर्यादा ओलांडत कांग्रेसी सत्तेने काश्मीर मधील मूल निवासी हिंदुंना काश्मीर बाहेर फेकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याच वेळी उर्वरित भारतातील जनतेला संभ्रमात ठेवण्यासाठी जातीयवादी प्रचार करीत 'काश्मीरी पंडितांचे पलायन' असा संदर्भ रुजविला. आधीच हाता तोंडाशी गाठ असलेल्या बहुसंख्य भारतीय लोकांनी मग काश्मीरातील हिंदुंच्या संघर्षाला सोयीस्कर रित्या दुर्लक्षित केले आणि काश्मीर मधील आतंकवाद एक नासूर बनून गेली तीन दशके हजारोंच्या कत्तलीस कारणीभूत ठरला आहे. काश्मीर मधील विस्थापितांचं जीवन जगणाऱ्या सुसंस्कृत हिंदुंची परवड गेल्या २०१४ पर्यंत आम्ही मूक दर्शक ह्याच नात्याने बघत होतो. पण विद्यमान पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर या विषयाला देशापुढे देशापुढील आव्हान ह्या रुपात उघड केले आणि तेथील अनागोंदी कारभार संपुष्टात आणून स्थितीवर सकारात्मक नियंत्रण मिळविण्यासाठी सखोल प्रयत्न केले. आज काश्मीर चे चित्र बदलताना दिसत आहे आणि मोदीजींच्या महत्प्रयासाने पुढील काही वर्षांत रक्तरंजित काश्मीर पुन्हा एकदा हरित नंदनवन बनणार आहे. कलम ३७० आणि ३५ चे निरस्तीकरण झालेले आहे आणि ह्या पुढे काश्मीर मध्ये सामान्य भारतीयाला शेती पासून ते अन्य उद्योगांपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची मुभा प्राप्त झालेली आहे. तेंव्हा बदललेल्या स्थितीचा सदुपयोग करून आपण कर्तव्य भावनेने आणि काश्मीर विषयी एकात्म भाव मनात बाळगून तेथे जास्तीत जास्त प्रमाणात आपले वास्तव्य वाढविण्यावर भर देणे क्रमप्राप्त आहे.
पुन्हा कधी काश्मीर की नंदनवन किंवा नंदनवन की काश्मीर असा प्रश्न मनात उद्भवू न देता काश्मीर हेच नंदनवन हे सत्य पुनर्स्थापित करुयात, चला देवभूमी ला आपल्या कर्तृत्वाने सुशोभित करूयात. 
भारत माता की जय
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home