Friday, 18 March 2022

कश्मीर मधील आतंकवाद आणि आपण

आज कश्मिर फाइल्स हा चित्रपट बघितला. मनाला एकमेव विचाराने पछाडले आहे. खरंच कां हे आतंकी हत्याकांड आणि कश्मिरी हिंदुंचे विस्थापित होणे आमच्या साठी त्या काळी केवळ बातमी पुरतेच मर्यादित होते. आज चित्रपट बघितल्यावर मनाला सुन्न करणारा हा प्रश्न डोक्यात गिरणीच्या भोंग्याच्या तीव्रतेने घणाणतो आहे.
चित्रपट कश्मिर चा इतिहास सांगतो तेंव्हा भारतीय संस्कृतीच्या अभिजात दर्जाचं उगमस्थान कश्मिर आहे हे आवर्जून सांगतो. हे ही प्रकर्षाने दाखवतो की वेदविद्या आणि परंपरांना अविरत जीवंत ठेवून विकसित करताना त्या प्रदेशातील निसर्ग अबाधित ठेवण्यातही त्या ज्ञानी मंडळींनी कोणतीही कसर ठेवली नाही. अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजेच कश्मिर मध्ये मुसलमानी दहशतवाद फोफावण्या आधी पर्यंत हा प्रदेश आशिया खंडातील नंदनवन म्हणून संबोधल्या जायचा. उणे पुरे २४-२५ वर्ष विक्षिप्त राजकारणी आमच्या नामर्द पणामुळे सत्तेवर निवडून येत राहिले आणि त्यांनी ह्या नंदनवनाचं पार वैराण जंगल करून टाकलं. 
लोकशाही नावाच्या बुजगावण्यानं आम्हाला नपुंसक बनवलंय की काय असा चीड निर्माण करणारा प्रश्न अंतर्मन पोखरून टाकतो आहे. पुरातन काळापासून अनेक रथी महारथींची चरित्रे आपण वाचत आलोय, ऐकत आलोय इतकेच नाही तर चित्रपटाच्या माध्यमातून बघतही आलोय. विडंबना ही की हे सगळं घडवून आणणारे सगळे पोटार्थी निघालेत. त्यांनी ही चरित्रे आम्हाला शौर्य आणि वीरता जागृत व्हावी अशा पद्धतीने नाही तर रंजक करून सांगितली, आणि दुर्दैवाने ही चरित्रे आमच्या मनोरंजनात अडकून खोलवर गाडली गेलीत.
विश्व बंधुत्वाची आमची जी संकल्पना आहे ती आदिम काळापासून चालत आलेल्या सनातन संस्कृतीशी निगडीत आहे. त्या काळात जितक्या म्हणून सभ्यता अस्तित्वात होत्या, त्या सर्वांचा पाया सनातन संस्कृतीच्या अभंग आणि ह्या सृष्टी इतक्याच शाश्वत वैचारिक पातळीवर उभारला गेला होता. सातव्या शतकापासून मुसलमानी संप्रदाय एका राक्षसी मनोवृत्ती तून जन्मला आणि भोगवादाची कास धरून अवघ्या धरणी वर धुमाकूळ घालता झाला. सतराव्या शतकापासून यूरोपीय देशांमध्ये महाविनाशी औद्योगिक आस्थापनांचा उदय झाला आणि तेथील रहिवासी ख्रिस्ती धर्मियांच्या हाती जणू जादूची कांडी लागली. त्यांना सुद्धा आसुरी आकांक्षांना पेव फुटल्यासारखे झाले आणि त्यांनी देखील जगभरातील मानवजातीची दैना करण्यात संपूर्ण शक्ती झोकून दिली. आता ही जीवघेणी स्पर्धा मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांच्या तथाकथित धुरिणांनी आपापल्या प्रतिष्ठेची करून पृथ्वी वर रणकंदन माजवले. आज आपण जगभर असंख्य राष्ट्रे एकतर मुसलमानी किंवा ख्रिस्ती धर्मियांच्या प्रभावाखाली असल्याचे बघत आहोत. हिंदु धर्म किंवा हिंदु धर्माची उपांगे असलेली बौद्ध-जैन-शीख आणि तत्सम इतर पंथ संप्रदाय मात्र आपल्या ऊच्च विचारसरणीचे अनुसरण करीत राहिली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विलक्षण उपलब्धीचं फलित आहे की आज जगातील सगळ्या धर्माच्या सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण होते आहे आणि त्यातून शाश्वत अशा भारतीय संस्कृती चा अभ्यास केला जात आहे. हळूहळू का होईना पण हिंदु संस्कार आता मुख्यत्वे आत्मसात केली जात आहेत.
हीच आता हिंदुंसाठी सुवर्ण संधी आहे की त्यांनी जगभर अव्याहतपणे हिंदु संस्कृतीचा, परंपरांचा प्रचार प्रसार करून ज्वालामुखी च्या तोंडावर उभ्या असलेल्या मानवजातीला योग्य ती दिशा द्यावी, जगाचं कल्याण करावं. वर्तमान युगातील समंजस मानव नृशंसतेला थारा देत नाही हा अनुभवण्याचा विषय आहे. वसुधैव कुटुंबकम् म्हणताना त्या उक्तीप्रमाणे कृती करणं क्रमप्राप्त आहे. विश्व शांति मंत्राची शक्ति जगाला तेंव्हाच कळेल जेंव्हा आम्ही समग्र भारतीय त्यांचं उच्चरवाने गायन करू. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए ही उक्ती कालबाह्य झाली असून दुनिया समझती है समझाने वाला चाहिए ही उक्ती मोदीजींनी प्रचलित आणि सिध्द करून दाखविली आहे. तेंव्हा या पुढे आपणच आपले स्वयंसिद्ध होउयात आणि जगातील सगळ्या मानवजातीला सन्मार्गावर आणुयात.
जय श्रीराम
वैचारिक क्रांतिने जगाचं कल्याण होवो.
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home