होय आम्ही लेकुरे
होय आम्ही लेकुरे...
तो बाप अमुचा भस्मधारी
शर वेधुनी शिरच्छेद घडवू ....
पुरतील शत्रू जोवरी.....१
हा धर्म अमुचा एक ऐसा की असे 'जगतांतरी'
जो कधी ना व्यर्थ मागे 'रक्त सिंचन' भू वरी...२ शंभु शंभु चिंतुनी खड्गे उसळती वैऱ्यावरी
ऐकुनी चित्कार 'त्यां'चा शमते क्षुधा अन वैखरी..३
चल 'रवि' साधू निशाणा एकेक त्या छद्मावरी
अक्षरांचे तीर झडू दे, तोतया स्वजनांवरी...४
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home