एक अनामिक भीती
चाल: रिमझिम झरती श्रावण धारा....)
झर झर झरती घामाच्या धारा
चड्डी च्या बुदल्यात....
नवाबाविण भकास झाली रात....||धृवपद||
धडक धडकते मन हे व्याकुळ
जेंव्हा ऐकतो बाहेर 'सायरन'
येईल का ई डी माझ्या दारी
सहजचि येई मनात.....नवाबाविण...||१||
संजय वदतो मिथ्या वाणी
ऐकुनी तव ते होई पाणी पाणी
जाईल कां हे वैभव लोपुन
तुरुंग दिसे स्वप्नात.....नवाबाविण ...||२||
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home