Saturday, 19 February 2022

मनमोहन उवाच

दिनांक २०फेबृअरी २०२२ च्या दैनिक जनसत्ता ह्या वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या बातमीनुसार मौनी बाबा अर्थात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जे काही बडबडले ते किती समय सापेक्ष आहे हे सर्वांना कळावे म्हणून हा लेखनप्रपंच करीत आहे.
त्यांनी आपल्या कथनात सांगितले की 'मोदीजी आणखी २० वर्षे जरी पंतप्रधान म्हणून राहतील तरी ते नेहरूला बोल लावल्या शिवाय राहणार नाहीत'.
ह्या ठिकाणी मौनीजींना असे सांगावेसे वाटते की होय मौनीजी ते तसे नक्कीच करतील. कारण, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ह्या देशातील भोळ्या भाबड्या जनतेने पूर्ण विश्वास दाखवून त्यांना मोठ्या आदराने पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि विश्वासाने १७ वर्षे
त्यांच्या कडे आशेने बघितले. पण वास्तवात हा माणूस त्यांच्या अपेक्षांना खरा उतरला नाही. उलटपक्षी, सत्तेचा अमर्याद उपभोग घेता यावा म्हणून कांग्रेस जनांना "फोडा आणि राज्य करा" असा मंत्र शिकवून गेला.
सत्तर वर्षे लोटावी लागली येथील जनतेला त्या विषवल्ली च्या विळख्याला समजायला. जनता पुन्हा त्या दुष्टचक्रात फसू नये म्हणून मोदींना सतत नेहरूंच्या कुकर्माचा पाढा वाचत राहणे क्रमप्राप्त आहे. 
इत:पर मौनी बाबाला कधी काही बोलावेसे वाटलेच तर त्यांनी निदान मोदींचा समाचार घेण्याचं दिवास्वप्न बघू नये. मोदींचा एक एक शब्द तुमची चिरफाड करण्यात कसूर ठेवणार नाही.
रविंद्र सरदेशमुख




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home