Monday, 11 April 2022

माझी सावली

माझीच सावली माझ्यासवे
खेळते विचित्र खेळ 
प्रश्न उलगडता उलगडता 
सम्पून जाई वेळ 
तीव्र उन्हांत संकोचते 
मावळतीला स्वैर 
रात्रीस पांघरुणात माझ्या 
दडते नि:संकोच 
युद्ध प्रसंगी तीही करते 
शत्रूशी डावपेच 
किती धावलो तरी ना थकते 
मी अडखळलो त्वां ती रडते 
अखंड साथी माझी साऊली 
अकल्पित तरी मला भावली 
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home