Saturday, 9 April 2022

अथ श्रीरामार्पण

मर्यादा पुरुषोत्तम ठरण्यासाठी ज्याला जन्मही ऐन दुपारी उन्हात घ्यावा लागला. प्रभुपद प्राप्त करण्यासाठी ज्याने दुसऱ्यांची दुःखे अंगिकारलीत व स्वयेचि कष्टला. चक्रवर्ती सम्राट असूनही ज्याला वियोगातच आयुष्य कंठावे लागले. मानवी समाजाला अत्युच्च दर्जाची शिकवण दिली, अशा दशरथ पुत्र राजा श्री रामाला अहोरात्र स्मरण करावे, त्यांच्या आदर्शमय चरित्राला क्षणभर देखील विसरू नये म्हणून सतत घोष करावा "जय श्रीराम जय श्रीराम जय जय जय जय जय श्रीराम".
श्रीराम नवमी अर्थात प्रभु श्रीरामाच्या जन्म दिनी आपण अधिकच उत्कटतेने त्यांचं स्मरण करून जन्माचा सोहळा संपन्न करूयात. 
🚩🥀🪔🙏🙏🙏🙏🙏🪔🥀🚩
भक्ति प्रार्थी कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home