Friday, 6 May 2022

तृतीय पंथी आणि संख्याबळ

नुकतंच विद्यमान महाराष्ट्र विकास आघाडीच्या विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एका मुलाखतीत असं विधान केलं आहे की संख्याबळ असेल तर तृतीय पंथी देखील ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो त्यांना एका पत्रकाराने ब्राह्मण मुख्यमंत्री बनू शकतो काय असा सरळ प्रश्न विचारला असता त्यांनी हे तर्कहीन विधान केलं आहे. संख्या बळानुसार ही तीन पायांची लंगडी आघाडी १६२ आमदार अशी आहे आणि सत्तेवर आरूढ आहे. त्यामुळे त्यांना येथे नक्की काय नमूद करावेसे वाटले ते त्यांनीच स्पष्ट करावे हे उत्तम. असो! 
आजच्या परिदृष्यात जरी भारतभरात आपण संख्या बळावर कोणा तृतीय पंथीयाला सत्तेवर काबिज बघत नसलो तरी, २० व्या शतकात, स्वातंत्र्य पूर्व काळात आणि त्या नंतरच्या काळात भारताच्या बापाच्या भूमिकेत येऊन पोचण्यापर्यंत ह्याच भारताच्या इतिहासात एक व्यक्तीमत्व असं होऊन गेलं आहे की ज्याची दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्या संबंधातील काही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्या पत्रांमधील आशय आणि भारताच्या ह्या बापाच्या पत्नीच्या पत्रांमधून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तृतीय पंथी म्हणजे नेमके कोण हे भारतीय संविधान व्याख्यांकित करीत असेल तर त्या निकषांवर ह्या धूर्त-ढोंगी तरीही भारतीय जनतेला एका नसलेल्या पितृत्वाचा आभास देण्यात यशस्वी ठरलेल्या महाशापाचा मुखवटा टराटरा फाडण्याची वेळ आली आहे.
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home