पाऊस आणि मन
वर्षा ऋतु अन मन हे माझे
हर्ष मनाला चपखल साजे
रिप रिप टिप टिप थेंब ही गाती
फुले पाने त्या संगे नाचती
हळूच येते मंद झुळुक ती
संवेदना त्या मग मोहरती.... वर्षा ऋतु अन..
गंध मातीचा जणु की अमृत
श्वासाला करी धुंद तयाप्रत
शरीर अवघे होई रोमांचित
जगणे अवघे पुन्हा प्रफुल्लित..... वर्षा ऋतु अन
ये रे पावसा असा बरस तू
जीव शिवांची मिटवी तरस तू
त्राता माता भ्राता सर्व तू
देवाचे वरदान आम्हा तू...... वर्षा ऋतु अन
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home