Saturday, 23 July 2022

उठा उठा पहाट झाली

उठा उठा पहाट झाली
गुरू पूजनाची वेळ झाली

शिष्यत्व अपुले भगव्या साठी
वर्तविण्याची वेळ झाली

सेवा व्रत 'संस्कार' आपुला
भगव्या साठी देह वाहिला 
हिंदु हिताचे रक्षण करण्या
"जागृत व्हा" हो वेळ झाली

धर्म भेद ना जाति भेद ही
भगव्या ची सर्वांस साऊली
राष्ट्रोत्थाना साठी समर्पण
करण्याची ही वेळ झाली

उठा उठा हो पहाट झाली
गुरू पूजनाची वेळ झाली 

कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home