भिजवणारा
होय मी भिजणार
पावसात भिजणार
अवकळणीच्या, मृगसरींच्या, वळवाच्या, झडीपाण्याच्या ........ पावसात भिजणार
होय मी भिजणार पावसात भिजणार
दऱ्या खोऱ्यांना, डोंगर शिखरांना, शेता पिकांना
झाडा पानांना भिजवणाऱ्या...
पावसात भिजणार
होय मी भिजणार पावसात भिजणार
चित्त वृत्तींना, छंद काव्यांना, जीवशिवांना
भिजवणाऱ्या..... पावसात भिजणार
होय मी भिजणार पावसात भिजणार
सुख दुःखांना, कष्ट वेदनांना, चिंता मुक्तींना
गती प्रगतींना छेदणाऱ्या... पावसात भिजणार
होय मी भिजणार पावसात भिजणार
निसर्गाच्या कुशीतून, विसर्गाच्या मुशीतून
धो धो बरसणाऱ्या .... पावसात भिजणार
होय मी भिजणार पावसात भिजणार
निसर्गाच्या कुशीतून, विसर्गाच्या मुशीतून
धो धो बरसणाऱ्या .... पावसात भिजणार
होय मी भिजणार पावसात भिजणार
ऋषी मुनींच्या, संत महंतांच्या, अभंगातून
कविच्या कवितेतून कवयत्रींच्या पद्यातून लेखकांच्या गद्यातून
आसवातून हास्यातून अश्रूतून मोदातून
सर्वकाही व्यापून अधिक उरणाऱ्या
पावसात भिजणार... होय मी भिजणार
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home