AarKay's Tips
Tuesday, 24 October 2023
Sunday, 15 October 2023
Thursday, 12 October 2023
पितरांची आठवण
असा कधीही क्षण येत नाही
मज पितरे ती भेटत नाहीजव आठवतो देव-गुरू ला
तव आठवती पितरे मजला
नसतो मी, जर न होती पितरे
वंश धर्म 'त्यां' मुळे समजला
पितृपक्ष जरी असे ठरवला
अस्तित्वची नच जर वंश हरवला
म्हणूनी स्मरा दिनरात तयांना
घास जरी कां असे भरवला
कवि 'रवि'
Tuesday, 10 October 2023
भ्रम
भ्रम
सांग कुणास्तव लिहू खरे मी
भ्रम हा सारिता 'शून्य' उरे मी
श्वास-देह कांहीच नुरे मग
वायुरुपातुन फक्त उरे मग
जव ज्वाळांनी आक्रांदित तनु
नभांतरी प्रच्छन्न धुमारे
मम देहाची रक्षा होता
सुटला सुटला म्हणती सारे
विलीन होऊन पंचत्वाप्रति
नाम रुपे तरी उरे कसा मी ?
भ्रम साधारण नाही जरी 'रवि'
उत्तर ह्याचे शोधू कसे मी!?
उत्तर ह्याचे शोधू कसे मी!?
कवि 'रवि'
Sunday, 8 October 2023
शौर्य की गाथा
आओ सुनें हम शौर्य की गाथा
जिसपे फिदा है भारत माता
जल थल नभ में अजेय है हम
देश भक्ति में लीन सदा हम
प्रेम भाव है जीवन की धुन
पर शत्रु पात करेंगे चुन चुन
हमसे अकारण जो टकराया
उसने बेडा गर्क ही पाया
संस्कृति रक्षण साथ ही जन मन
लक्ष्य हमारे बुलंद क्षण क्षण
शस्त्र और शास्त्र अध्ययन
मानव प्रगति यही ध्येय धन
कवि 'रवि'
