Friday, 19 July 2024

वारी पंढरीची

पंढरीची वारी जणू सुखाची ती स्वारी 
झाले हो दर्शन परी पाय निघेना लौकरी||धृवपद||
एकाचिये ठायी एक विसावला 
एकचि बैसला पांडुरंग ||१||
मन झाले दंग टाळ मृदंगाच्या संग 
आत्मा पांडुरंग ऐसा झाला ||२||
दिंड्या पताकांची झाली मांदियाळी 
विठ्ठल पावला भक्तांलागी ||३||
'रवि' म्हणे देवा तू माझा कैवारी 
असोनी संसारी सुखे केले ||४|
कवि 'रवि' 

Sunday, 14 July 2024

पाऊस म्हणजे काय रे भाऊ!?

येणार येणार म्हणून 
खाते तज्ञांनी ग्वाहीच दिली 
खात्रीशीर पणाने तो आलाच नाही 

त्याच्या वर्षावाला आसुसलेल्या डोळ्यांनी मात्र 
अश्रूंचे पाट वाहवले 

तापलेल्या धरणीने काढला 
आसूड चटक्यांचा 
आणि निर्दयतेने झोडपले चराचराला 

जीव सचेतन आणि अचेतनही 
वदले 'त्राहिमाम त्राहिमाम' 
पहाडावर वणव्यांनी जल्लोष केला 

पाऊस म्हणजे काय रे भाऊ!?
प्रश्न उद्गारला अत्याधुनिकते कडे वळलेल्या जगातील टेकसॅव्ही शिशुने 
तितक्याच अज्ञानी त्याच्या भावानेआभाळाकडे एकदा शून्य नजरेने बघितले मात्र!

दूर एका मंदिरात सुरू झाला यज्ञ 
पर्जन्यासाठी 
आणि त्याची झळ पोचली वरुणराजाला 
कृद्ध होऊन त्याने धुत्कारले माणसाला 

म्हणाला!

जे हवे ते न मागता न चुकता 
आम्ही तुझ्या पदरी घातले सातत्याने 
पण दंभ तुला झाला तुझ्या भ्रामक कर्तुत्वाचा 
निसर्गाची चीरफाड करणाऱ्या आधुनिकतेचा 

परीणाम तुझे तूच जन्माला घातले आहेस 

भोग काय असतात हे कळत असेल तर 
आतातरी जागा हो क्षमायाचना कर 

धरणी तुझीच आहे आकाश तुझेच आहे 
पंचमहाभूतांचा कल्लोळ ही तुझाच आहे 

यज्ञ संपन्न होण्याची पावती म्हणून मग 
घन गरजले, विजा चमकल्या,
आकाशातून प्रेमाचा ओघ बरसला 

माणूस काय पशुपक्षी काय, किडे कीटक काय 
सर्वांच्या मनातून प्रकटली आनंदाश्रूंनी सजलेली लाट 
प्रत्येकाने अनुभवली एक अवर्णनीय सृजनाची पहाट

पाऊस म्हणजे काय रे भाऊ!!!?

पाऊस म्हणजे श्वास, पाऊस म्हणजे आस 
पाऊस धरणीची प्रतिक्षा, पावसा विना जीवन शिक्षा 

पाऊस म्हणजे सूक्ष्माला विशाल करणारं साधन 
प्रसवण्या साठी धरतीला देवांचं अभिवादन 

एक थेंब पावसाचा पुरला तर समृद्धी 
तो नाही जिरला तर क्षुद्र ठरते बुद्धी 
क्षुद्र ठरते बुद्धी 
कवि 'रवि'

Tuesday, 2 July 2024

जन-मन की कामना

जन-मन की कामना है 
हिंदू राष्ट्र यह कहलाए 
विश्व भर में ध्वजा 
सनातन की अखंड लहराए 
महारथीयों की भूमि यह 
धर्म की उत्कर्षा है 
सत्य जिलाने शक्ति 
करती रक्त की वर्षा है 
देह तो है नश्वर यह किंतु 
चरित्र अजरामर है 
युद्ध भूमि को अर्पित 
जीवन लड़ने को तत्पर है 
हम योद्धा है धर्म राष्ट्र के 
हमें नहीं भय कुछ भी 
शत्रु का शिर छेदने सक्षम
धैर्य शौर्य और वीर्य भी
मुझ पर है उपकार मां तेरा 
पुत्र तेरा कहलाया 
राष्ट्र धर्म नीति से बढ़कर
 कुछ नहीं हमको भाया 
एक अपेक्षा धर्म बंधुओं 
जागृत अब हो जाओ 
शत्रु का नि:पात करने 
अब जागो और जगाओ 
कवि 'रवि'