Friday, 19 July 2024

वारी पंढरीची

पंढरीची वारी जणू सुखाची ती स्वारी 
झाले हो दर्शन परी पाय निघेना लौकरी||धृवपद||
एकाचिये ठायी एक विसावला 
एकचि बैसला पांडुरंग ||१||
मन झाले दंग टाळ मृदंगाच्या संग 
आत्मा पांडुरंग ऐसा झाला ||२||
दिंड्या पताकांची झाली मांदियाळी 
विठ्ठल पावला भक्तांलागी ||३||
'रवि' म्हणे देवा तू माझा कैवारी 
असोनी संसारी सुखे केले ||४|
कवि 'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home