डोळे
कधी कुणा वाटती भयंकर
कधी कुणा ते दिसती भोळे
शब्द साधण्या जमते ना तरी
डोळ्यां संगती बोलती डोळे
दृष्टीहीनाची दृष्टी डोळे
बधिरांशी ते बोलती डोळे
तान्हुल्याची तशी भावना
मातेसाठी बनती डोळे
नक्षत्रांचे ज्ञान उमगते
आकाशी जव लागती डोळे
अंधारी जव भुलतो माणुस
ज्योत दिव्य दाखविती डोळे
विकार मनींचे उघडे पडती
सज्जन जेव्हा डोळे बघती
अंताची चाहूल लागता
ईश्वर चरणीं झुकती डोळे
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home