ध्यानीमनी चित्ती
ध्यानीमनी चित्ती
सदा राम पाही
तयासी सुखाची
कदा भ्रांत नाही
असे नाम ज्याच्या
श्वासात लिप्त
तयासी पडेना
कशाची ददात
राम एक दाता
राम ची हो त्राता
राम सेवकांचा
सदा ज्येष्ठ भ्राता
मुखी राम येता
शत्रु होई नि:शेष
तशी रामरक्षा
असे हो विशेष
अशा रामराया
सदा आठवावे
नित्य कार्यारंभी
सदा ते वदावे
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home