हृदयांत भावनांचा....
हृदयांत भावनांचा (वि)जय तो ठरून गेला
एक थेंब आसवाचा क्षरितां विरून गेला
माझ्याच पावलांनी नाकारले स्फुरण ते
अंतिम श्वास होता तो ही सरून गेला
देता तयास अवघे झालो निःसंग आता
अंधार अंतरीचा मज सावरून गेला
एकेक ती कहाणी राहील साक्ष म्हणुनी
शून्यातची विहरला शून्यास पांघरून गेला
भ्रम हा तरी मला कां छळतो उगाच आता
मिथ्या अशा जगी ह्या'रवि' गांगरून गेला
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home