विसरू जरी पहातो
विसरू जरी पहातो तरी मी तृषार्त आहे
माझ्यातल्या मला मी शोधीत जात आहे
एकेक जख्म़ रिसतो रक्ताळल्या स्वभावे
मीठ त्यावरी आणि मी चोळीत जात आहे
'आशा' कशात नुरली समजावितो स्वतः ला
अन् क्रुद्ध भावनांना जाळीत जात आहे
हे काय जाहले की 'पद दलित' मानताती
मी त्या छुप्या खुणांना मोडीत जात आहे
आता कवेत नाही ते 'आसमंत' जेंव्हा
अपुल्याच कल्पनांना खोडीत जात आहे
झिडकारल्या देहाला कुरवाळितो कशाला
'रवि' खेळ मांडला तो उधळीत जात आहे
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home