Monday, 28 June 2021

एक विनंती

मिठ्या मारतां मारतां, भांडणावर आलो
खऱ्या अर्थाने आम्ही मराठी झालो...१
शेकडो वर्षांचा गुलामीचा पाश
शिवरायांनी तोडला....२
स्वराज्याचा सुंदर घास....
आम्हां साऱ्यांना भरवला...३
त्या स्वराज्याला भस्म करण्या
इंग्रज सरसावले.....४
जातीवादाचे विष त्यांनी 
पुन्हा एकदा भिनविले...५
तोडा फोडा राज्य करा
मन्त्र त्यांचा फोफावला...६
भारत धर्म अवघा 
स्वार्थापोटी बाटवला....७
जळून गेली इंग्रजशाही
फुटीरता कांही सम्पली नाही...८
जातिभेदाची विषवल्ली
भीमरावांना पण रुचली नाही...९
ध्येय वेडे रसातळी अन 
संधी साधू सत्तेवरी.....१०
स्वातंत्र्याला समजती जणु की
ताटा मधली पुरण पोळी......११
७०वर्षे झाली तरीही 
संविधान ते नाही प्रभावी.....१२
प्रयत्न करी जो प्रामाणिक तो
चढतो पुढती सुळावरी.......१३
आता तरी हे समाज जनहो
समजा ही कुत्सित खेळी...१४
प्रयत्न जे करिती विखारी 
नकारा तयांना अचूक वेळी...१५
रवींद्र सरदेशमुख (कवि'रवि')

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home