Tuesday, 15 June 2021

भान

कां असाव्या भिंती, जर हे विश्वची माझे घर"। धर्म तरी कां अनेक, जर हे एकची अपुले घर।
विज्ञानाची कास धरोनी सर्व चालले पुढे, चाली रुढींना तरीही संगती को धरावे बरं ॥
क्रीडा, शिक्षण, आणिक तंत्र हेची नवे मंत्र
साधु, मुल्ला, पादऱ्यांना ही का नमावे बरं ॥
चला गड्यांनो आतां असावी एकची अपुली आस 
पर्यावरणा सुदृढ करुनी पृथ्वी करुया खास !!
यांत्रिक सोई जरी वापरू तरी ठेवू मनासी जाण 
पृथ्वी वरल्या सर्व जिवांचा करू आम्ही सन्मान !
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home