Monday, 14 June 2021

जिद्द

आयुष्याची वाट लागली 
तरिही स्वार तो स्वप्नांवरती . 
मुखी विळसते हास्य जरी का 
हजार जखमा अंगावरती
जगू जगू म्हणताना 
तो तर मरतो आहे दिन प्रतीदिन 
मरता मरता करतो आहे 
धडपड तो ती सर्वांगीण
ध्येय म्हणावे याला की मग 
असे मनाचे वेडची हे 
ध्यास साधणे" इप्सित" 
प्राप्य तयाचे एकची हे
वज्र जाहले डोळे 
पापण्यांतही अश्रू नसे 
अंधाराची साथ तरी पण
मार्ग तयाला स्पष्ट दिसे
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home