Wednesday, 23 June 2021

अप्रकाशित पृष्ठ मी

 अप्रकाशित पृष्ठ मी

माझ्या व्यथा सांगू कुणा

शब्द अंधारात विरले

प्रस्तावना मागू कुणा


लेखणीतून रक्त उतरे

अक्षरे बंबाळली

मथळा लिहिण्यात माझे

हात ही रक्ताळले


ही कथा आहे तमाची

दृष्ये ही अंधारलेली

वाणी वैखरी नि:शब्द तरीही

गोष्ट ही साकारली


अल्प असती सौख्य अनुभव

म्हणुनी ते झुरती बघा

कल्पनेच्या कोंदणी

बघतात त्या उघड्या नभा


मी असा का रात्रवेडा

हाच वेडा प्रश्न आहे

माझिया नशिबी तमाचे

अतर्क्य ते साम्राज्य आहे

कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home