Monday, 14 June 2021

शब्द रूपे

शब्द माझे धाव घेतात 
अंतरातून अंतराळाकडे | 
आसमंत हा पिंजून येतात,
अंतराळातून अंतराकडे 
शब्दांनाही जपावे लागते
शब्द ही जख्मी होतात 
हळूवारपणे फिरविला जर हात
शब्द प्रेम लावून जातात
शब्द जातात? होय! 
शब्द हे जाण्यासाठीच असतात
अंतरातून अंतराकडे 
शब्दाची देवाण घेवाण करताना 
शब्दांचेच साकडे
निःशब्द राहूनही कधीतरी 
बोलता येते शब्दांची भाषा
म्हणूनच मग त्यावेळी वाजतात
नेत्र पल्लवींचे चौघडे 
कधी शब्द होतात सैर भैर
अन सोडतात फूंकार 
भले भले चारित्र्यवान 
मग पडतात नागडे उघडे
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home