शब्द शक्ति
शब्द हे संहारक अस्त्र
शब्द ची हो भावना
शब्दावीण अन्य दुजा
मार्ग नसे हो यामना
शब्द जपावे, शब्द विखुरावे
शब्दांनीच हे विश्व साकार
शब्दांना घेऊ दे नित्य
मंगलमय आकार
एक शब्द शेवटी तुला हा
सांगावासा मनी असे
शब्द मनीचा मनी घरला तर
संग तुझ्या रे कुणी न दिसे
ह्यास्तव उधृत कर शब्दांना
आणि सिद्ध हो शब्दां सम
प्रेम असू दे शब्दां वरती
पंचप्राण अन तत्वासम
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home