प्रणय
कोकीळ गातोय आंब्याच्या बनात
गुदकन हसू आलं तिच्या मनांत
वसंत आला आम्र बहरला
प्रेमाचा आलाप हृदयात भरला
भिरभिर नजर क्षणभर थांबली
प्रणयाची पतंग दूरवर लांबली
इकडून तिकडे करी शतपावली
लाजून चूर जरी दिसली सावली
वाटे कधी बोलू, पण, कशी काय बोलणार त्याने पुढे झाल्याविना नाहीच चालणार
प्रेम असं कसं वेडं पिसं बाई
घडीभर सुद्धा करमत नाही
जीवाचा मैतर तरी अणजाणा
एकदाची भेटेन करून बहाणा
हिम्मत करुनी गेली माडीवरी
नेमून नेटकी साडी चोळी बरी
त्याने पाहिले तिला अन सावरता झाला
म्हणे तूच आहेस की भास होतोय मला
तिची मान खाली कान आसुसले हावभावातून त्याला सारे समजले
क्षणातच तिने पाय काढता घेतला
त्याच्यावरी आता मोठा प्रसंग बेतला
त्याने मग घातले आईला साकडे
सून म्हणून तू तिला स्विकार ना 'गडे'
एक दिनी विवाहाचे वाजले चौधडे
कोकीळ तो अजूनही गातोय पोवाडे
कोकीळ तो अजूनही गातोय पोवाडे
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home