Tuesday, 29 June 2021

मी जरी जगलो

मी जरी जगलो
जीवन हरले
बेरीज करतां
'मी' पण उरले

शब्द ही छळती
भावनांसी ह्या
नाती गोती ही
काहिच नुरले

अंत असा हा
विद्ध करी मम
गंड मनातील
सारे जिरले

देव देवता 
देव्हाऱ्यात ची
यमा देखता
ज्ञान हे स्फुरले

कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home