Monday, 12 July 2021

ज्ञात वा अज्ञात

ज्ञात वा अज्ञात तो जरी
मी विसंबुन तयावरी
मज श्वास ही देतो
 बघा शब्दांप्रति ती वैखरी

वाटेत अंधारात त्या
विश्वास तो आहे पुढे
पाउले त्याची दिसावी
अन हस्त तो माझ्या शिरी

मातेचिया पान्ह्यात तो
पितरांचिया नेत्रांत ही
मित्र सखे त्याचीच रूपे
त्याची कृपा अशी मजवरी

जग म्हणे रे फाटक्या 
तुजला श्रीमंती न कळे
मी तयां हासून म्हणतो
हा खेळ आहे ईश्वरी

कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home