आणि हे सगळं अवचित घडतं
कां ठाऊक नाही पण
नेहमी असं होत जातं,
स्वप्न पडतात पण तुटून जातात.
विचारांना ध्येयात
परिवर्तित करता करता,
विचारच अचानक बदलून जातात.
ती दृश्ये जी समजूतीला
विश्वासात परिवर्तित करतात,
काळाच्या ओघात कुठे वाहून जातात. आपल्या मनस्वी पणाचा
कां कोणी विषाद करावा,
इतरही अनेक प्रथितयश भटकून जातात. 'रवि' एक यकश्चित ओळख आहे तुझी,
मोठी प्रस्थ देखील येथे दडून जातात. कवि'रवि'🙏

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home