सावल्या
सावल्या
गत आठवांच्या
कां कधी
मिटणार आहे?
तोच मी
पुन्हा नवा कां
'जन्मीं ह्या'
दिसणार आहे?
रोज अंधारून येती
शुभ्र ते नभ 'अंतरी'
मैफली 'सुखदायकांच्या'
स्मरुनी 'दम' दाटे उरी
आजचा मी 'काल' जगतो
हे कधी टळणार आहे?
तोच मी पुन्हा नवा कां............
विश्व केले पालथे पण
अजुनी उरे ती 'पोकळी'
'विस्तवावर' वास्तवाच्या
करपेल ती पोळी 'शिळी'
भान हे 'सरत्या दिसांचे'
कां कधी येणार आहे?
सावल्या गत आठवांच्या..........
तोच मी पुन्हा नवा कां..............
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home