Saturday, 23 July 2022

राम राम भौ

राम राम भौ, 
कसं काय चालू हाये समद्या भावाईचं? 
भौ तुमाले सांगतो काल सकाळूनच मले डोंबिवली मंजी पुन्याहून डोंबिवली ले जायाचं काम पळ्ळं आन काय सांगू राजे हो काय रस्ता, काय डोंगार, काय पाऊस! समदं वोक्केच वोक्के 😀😀👌
मले राजे हो लोनोळ्यात घुसून गोल्डन वडापाव वाल्याच्या तथून शान मूंग भजी खायाची ल..य विच्छा झाल्ती पन भौ तुमाले सोळून एकल्यानं खायाचं काई मन व्हईना भौ. तवा पोराले म्हतलं की बेटा आपून सरकेतीर फुळे जाऊन शान तथी फूळ कोर्टात थांबू, मंग तुले जे पायजेल ते खायजो बॉ! पन मले काई खायाची विच्छा नाई बावा. पोरगं लय हुशार, त्यानं वयखलं का बाबाचे दोस्त संग नाईत तं थे काई खातिन नाई तसं गेलं त्याच्या 'माय'जोळ आन म्हंते कसं का मम्मी बाबाले खाऊ घालाचं कसं थे तूच पाय. आपुन काई त्यायले समजाऊ शकत नाई, तशा आल्या मालकिन बाई आन म्हनल्या कां हमेशा का तुमच्या दोस्तायले संगं घिऊन फिरू शकता काय? आन लोनोळा काय लय दूर हाये काय? 
येजा घिऊन त्यायले एखांद्या रोजी!!
पन खरं सांगतो भावाइहो मन कसनुसं करून मंग म्या तथी जास्त नाई पन एक वळापाव खाल्ला, एक चनाभेळ खाल्ली, लेकानं लयच म्हतलं तवा छोले भटुरे खाल्ले आन उताऱ्यासाठी एक चहा पिऊन ढेकर देत पुन्ना गाडीत यिऊन बसलो. 
सारी कामं उरकून रातच्याले घरी आल्यावर काई सुचेना तवा आडवा झालो तं पायटुनच जाग आली. तवा इचार केला का बॉ सांगून टाकाव भावाइले कालची हकीकत. 
वाचून झाल्यावर जरूर जरूर सांगजा भावाइहो तुमाले कसं वाट्टे तं. 
बाकी सारं ठीक हाये भौ, राम राम!
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home