गुन्हा काय आहे!?
खरे बोलणे हा गुन्हा काय आहे
असे वागणे हा गुन्हा काय आहे
जयांच्या जिभेला नसे हाड काही
झुगारू तयांना.... गुन्हा काय आहे
अहंमन्यता ती उसंडे जयांची
तिला थोपवावे.... गुन्हा काय आहे
मनीं दंभ ठेवी श्रीमंती कशाची
अशां नागवीता.... गुन्हा काय आहे
दिसेना जयांना व्यथा वंचितांची
अशांना ठोकावे.... गुन्हा काय आहे
'रवि' आज दुनिया खऱ्याच्या युगाची
युगासंगे जावे.... गुन्हा काय आहे
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home