कां कुणास ठाऊक
कां कुणास ठाऊक पण सहजच
असं वाटलं
यंदाच्या वर्षी जणू भारतावर
आभाळच फाटलं
आसेतु हिमाचल सगळीकडे
पावसाचं 'थैमान'
ढगाळलेलं आकाश पाहून
'बळीराजा' हैराण
तुडुंब झाली धरणे, नद्यांना 'ऊफाण'
'माणसाविना' वाहताहेत रस्ते
गल्ली मोहल्ले विराण
समजत नाही "रवि" ह्याला
कशाप्रकारे घ्यावे
निसर्गाचा प्रकोप की 'देवाने सोडले भान'
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home