ऑपरेशन सिंदूर
दोस्तहो
जय श्रीराम
आठवा २२ एप्रिल २०२५ चा तो दिवस!
होय, आपल्या पैकीच काही हिंदू कुटुंबीय आता उन्हाळ्यात सुट्ट्यांचं औचित्य साधून काश्मीर मधील पहलगाम येथे आनंद घेण्यासाठी गेले होते. घातपाती मनोवृत्तीच्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर धर्म विचारून गोळ्या घातल्या, सोबतच बेशरमपणाने आम्हां हिंदुंना तसेच भारत सरकार आणि पर्यायाने मोदींना मिळवण्यासाठी संदेश पाठवला की करा आमचं का वाकडं करू शकता ते. मित्रांनो, पार्श्वभूमी लक्षात घ्या, कलम ३७० रद्द केले तेंव्हा पासून केवळ दहशत वादीच नव्हेत तर देशातील असंतुष्ट मंडळी मग ती राजकारणातील असोत की व्यवसायातील असोत किंवा प्रसार माध्यामातील सदोदित असंतोष पसरवीणारी सडक्या मेंदूची मंडळी असोत, सगळ्यांना ते कलम हटविल्या नंतरची शांतता, काश्मीर खोऱ्यात सुधारलेली परिस्थिती आणि पुन्हा नव्याने सुरू झालेली पर्यटकांची वर्दळ बघवत नव्हती. आजही कांग्रेस सह इतर अनेक पक्षीय नेतेमंडळी पाकिस्तान धार्जिणे आहेत आणि पाकिस्तानची तळी उचलून धरण्यात धन्यता मानतात.
पहलगाम मधील हिंसाचार हा काय अचानक घडलेली घटना आहे काय? नक्कीच नाही! ह्या बाबतीत बऱ्याच लोकांनी 'इंटेलिजन्स सेल्युलर'
असा शब्द वापरून सुरक्षा यंत्रणेवर ठपका ठेवून त्यांची अब्रू ओरबाडण्याचा "गिधाडप्रवृत्तिने" प्रयत्न सुद्धा केला पण सुदैवाने ह्यावेळी भारतीय जनतेने त्यांना दुर्लक्षित करून वरील निर्घृण हत्यांचा प्रतिशोध घेण्यासाठी एक विलक्षण एकता दाखवून पंतप्रधान मोदीजींना प्रचंड बळ प्रदान केले. अशा प्रकारची प्रतिक्रिया ह्यापूर्वी १९४२ मध्ये चले जाव आंदोलनाच्या वेळी एकदा जगाने बघितली, अनुभवली होती आणि त्या वेळी इंग्रजांनी येथून पळ काढला होता. त्यांच्या पलायनाचं श्रेय लाटून कुणीतरी ऐरागैरा आमच्या देशाचा बाप बनून आजतागायत मिरवत आहे ही आमची शोकांतिका आहे, असो!
ह्यावेळी मात्र निधड्या छातीचा नेता देशाचं नेतृत्व करीत आहे आणि त्याची युद्ध निपुणता आणि राजकीय समझदारी किती जबरदस्त आहे हे आम्हाला प्रत्यक्ष ऍक्शन मधून बघायला मिळाले. ज्या शत्रूचा विच्छेद करायचा त्याला कसे गाफील ठेवावे ह्याची अनेक उदाहरणे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून तुम्ही आम्ही सगळ्यांनीच वाचली आहेत. त्यांना रंजक समजून अनेकदा चर्चासत्रे देखील आयोजित होतात. पण, छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा सखोलपणे अभ्यास, मनन आणि कृतिपूर्वक सदुपयोग करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणून मी पंतप्रधान मोदीजींकडे बघतो. मला त्यांच्या प्रत्येक कृति मध्ये शिवरायांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींवर मात करण्याच्या हातोटीचा प्रत्यय येतो.
२२ एप्रिल नंतरचा घटनाक्रम नीट तपासा, तुम्हाला प्रत्येक बाबीची उकल होत जाईल.
माझ्यासह जगातील प्रत्येक व्यक्ती मोदींना अकर्मण्य ठरवून मोकळा झाला होता, प्रसार माध्यमे काय, यू ट्यूबर्स काय किंवा राजकीय विश्लेषक काय सगळेच मोदी विरुद्ध जणू तुटून पडले होते. मोदी मात्र निःशब्द, प्रतिक्रिया विहीन! जग आश्चर्य करीत होते आणि आपण निराश,हताश होऊन जड झालो होतो.
बघता बघता ६ मे ची रात्र किंवा ७ मे ची पहाट उगवली आणि माध्यमांनी जग दणाणून सोडले.
अचानक एक चमत्कार व्हावा तशी बातमी वाऱ्यावर पसरली, पहाटे नित्यक्रमानुसार झोपेतून जागे झालेल्या सकल भारतीयांना सुखद धक्का देणारा तो क्षण ठरला. "भारताने पाकिस्तान मधील ९ ठिकाणी प्रचंड मोठा सर्जिकल स्ट्राइक करत शेकडो आतंक्यांच्या नरडीचा घोट घेतला. केवळ इतकंच नाही तर दहशतवादाची शेती ठरली अशी ९ केंद्रे पूर्णपणे उध्वस्त केलीत. छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणजे नेमके काय असायचे ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण मोदीजींनी दाखवून दिले. आणि एवढा प्रचंड घाला घातल्यावर देखील कुठे ही अघळपघळ वाच्यता नाही.
मित्रांनो या कृती नंतर मोदीजींनी जगाला संबोधित करताना हे खड्या आवाजात ऐकायला लावले की आमच्या स्ट्राइक मधून आम्ही फक्त आतंकी ठिकाणांनाच लक्ष्य केले, पाकिस्तानी सैन्य ठिकाणे किंवा इतर संरक्षण विषयक संवेदनशील ठिकाणांवर हल्ला केला नाही. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानला कडक ताकीद दिली की जर तुम्ही प्रतिहल्ला करायला धजावलात तर तो तुमचा आत्मघातकी प्रयत्न ठरेल!
जगातील नालायक राज्यकर्त्यां मधील अग्रणी पाकड्या सरकारला त्यामागची गंभीरता काही कळली नाही आणि त्यांनी त्यांच्या महामूर्ख पणाने सर्वनाश ओढवून घेतला. ४ दिवस आक्रमण चालले आणि भीकेत मिळालेल्या अवजारांच्या भरवश्यावर डिंग हाकणाऱ्या पाकिस्तानची पार रया गेली, जगभर नामुष्की ओढवली, पाकिस्तानी जनता भयग्रस्त झाली, इतकं कमी की काय तर पाक सैन्याधिकारी सुद्धा पळत सुटले. निरपराधांचे बळी घेताना दाखविला जाणारा थंडपणा क्षणार्धात लयाला गेला आणि हे भ्याड नीच हरामखोर पहिल्याच फटक्यात जीव जाणार ह्या भीतीचा अनुभव घेऊन गर्भगळीत झाले.
सिंहाच्या गर्जनेची महती काय आहे हे पहिल्यांदाच पाकड्यांना कळले आहे. पुन्हा आगळिक करतील असे वाटत नाही तरीही आपण सावध आहोत हे आदरणीय पंतप्रधान मोदींनी ' ह्यापुढे कोणत्याही प्रकारची दहशतवादी कारवाई हा युद्धाचा प्रयत्न' ह्या स्वरूपात गणली जाईल आणि त्या विरुद्ध प्रत्यक्ष युद्ध रुपात उत्तर दिले जाईल हेही ठणकावून सांगितले आहे.
मित्रांनो या पुढे देखील आपण सर्व भारतीय आदरणीय मोदींच्या नेतृत्वाची अशीच पाठराखण करीत राहू असे आश्वासन नव्हे वचनच मी ह्या प्रस्तुती द्वारे त्यांना देवू इच्छितो.
जय हिंद
भारत माता की जय
वंदे मातरम्
लेखनप्रयास कर्ता
रविंद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home