Thursday, 26 June 2025

वारी पंढरीची

आली आषाढीची वारी
वाट धरली पंढरी
डोक्यावर वृंदावन
मुखे विठ्ठल गजरी

देव विठोबा सावळा
गळा तुळशीच्या माळा
रंगे कीर्तनात सदा
माया भक्तांवर करी.....आली आषाढीची वारी

माय झाली रखुमाई
प्रेम सुख सर्वां देई
भक्त तारावया तीचा
पान्हा फुटे हो सत्वरी....आली आषाढीची वारी

'रवि' म्हणे मायबाप
माझे विठ्ठल रखुमाई
देती दर्शन मजलागी
सुटे इहलोकीची फेरी....आली आषाढीची वारी

कवि 'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home