गझल: गे लेखणी थांबू नको
गे लेखणी थांबू नको
अजुनी व्यथा जीवंत आहे
समजू नको गे तू कधीही
ह्या कथेला अंत आहे
जीवनाला झोडपूनही
श्वास कां कधी थांबला
रक्तिमा वर क्षार मर्दुनी
काळ बघ हसतोच आहे
भाग्य अन कर्मास देती
दूषणे जव ते साध्य नाही
येथल्या नियमांस अजुनही
पूर्णतेची आस आहे
एक धागा बांधुनी
सात जन्माचा भरोसा
ठेविते जी माय गृहिणी
रोज पान्हा पाजुनी ही
तव संसार कां अतृप्त आहे
जोडण्या तो हार पुष्पें
छेदुनी घेती स्वभावे
आसवांचे मेघ वर्षुनीही
भावना कां शुष्क आहे
रात्र वैरी जाहली बघ
नसत्या प्रथांना चिंतुनी
भेटला तो सूर्य तरीही
अंधार मनींचा दाट आहे
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home