Sunday, 13 June 2021

चेहऱ्यांची जत्रा

येथे माणसे फक्त चेहरे होतात. 
तांबडे, लांबट, काळे, गोरे
असंख्य आकारांचे चेहरेच चेहरे
चुंबका प्रमाणे 
एकमेकांस घट्ट चिकटलेले तरीही
चुंबकाच्या न्यायाने 
एकमेकांपासून परावृत चेहरे
चेहरे हासतात ही कधीतही
ओळखीचे ते स्मितहास्य
रोज ठराविक साथ करतात
तरिही अलीप्त हे चेहरे
एखादा चेहरा 
दिसला नाही एक दिवस 
आजू बाजूस त्याचा शोध घेतात चहेरे
दुसऱ्या दिवशी मूकपणाने 
प्रश्न टाकतात हे चेहरे 
शब्दाशिवाय ही सारे काही 
बोलत असतात हे चेहरे
अगणित काळचं गणितीय फळ 
आहेत हे चेहरे
मला काय त्याचे असा भाव घेऊन जगताहेतच जगताहेत हे चेहरे
चेहरेच चेहरे चेहरेच चेहरे
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home