Saturday, 12 June 2021

आकाशातील ताऱ्यांनो

आकाशातील ताऱ्यांनो
तुम्ही साक्ष होतात ह्या सृष्टीच्या सृजनाला
आणि साक्ष होतात
येथे जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाला तुमच्यामधले तेज कदाचित
तुम्ही अर्पण ही केले असेल तेंव्हा 
काय त्यावेळी तुम्ही समजला होतात
येथील सृजनशीलता कधीतरी 
तुमच्या अस्तित्वालाच हात घालेल 
आणि पृथ्वीच्या पार ही कधी
माणसाची जात पोहचेल
पण बघा तुमच्या कर्माचे फळ 
आज तुम्हालाच वेडावतेय
सृजनातून विध्वंसाची भिती
तुम्हालाही भेडसावतेय
होय हे होणारच
विज्ञानाच्या नियमाने होणारच 
आकाशातील ताऱ्यांनो
आतातरी जागे व्हा 
पुन्हा एकदा ह्या सृष्टीला 
पूर्ववत करा, सृष्टीला पूर्ववत करा
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home