Saturday, 12 June 2021

स्मृती वात

मनाच्या कोंदणातील तुझ्या आठवणींचा
तो नंदादीप उजळला मात्र 
आणि मग
गतस्मृतींची दिवाळीच झाली .....||१||
सुर्र सुर्र उडणाऱ्या
भुईनळातील बारूदी प्रमाणे 
सारे प्रसंग जीवंत होऊन
अंगावर उधळून आले! ...........||२||
कांही क्षण मन सैर भैर झालं
आणि पुन्हा
भुईनळा प्रमाणे शांत शांत झालं....||३||
वास्तवाची जाण 
बुद्धी इतकं कुणीच ठेवत नाही.
आणि म्हणूनच, संपावसं वाटलं तरी
संपता येत नाही.......................||४||
नंदादीपाची अखंड ज्योत
सतत तेवतच राहणार
निश्चलतेने
कुणी उजळो वा न उजळो
जळतच राहणार ..................||५||
स्मृती जरी गत असल्या तरी
वर्तमानाशी सतत निगडीतच असतात तोडावेसे वाटले तरी
रेशीम बंध घट्ट असतात 
रेशीमबंध घट्ट असतात...........||६||
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home