Saturday, 12 June 2021

बाबासाहेब भिमराव

युग प्रवर्तका तुला शत शत प्रणाम 
तुझ्या बुद्ध्योत्कर्षाला शत शत प्रणाम
वैचारिक क्रांतिच्या नभांगणातील 
तूही प्रखर चमकता तारा
अभ्युदयार्थ पिडितांच्या 
तू देह झिजविला सारा
समता, न्याय आणि सहजीवन 
तुझ्या आधुनिक युगाचे मंत्र झाले
पेरलेल्या त्या बिजाला 
बघ आज उत्कृष्ठ फळ आले
तुझ्या जिद्दीला प्रणाम, तुझ्या वृत्तीला प्रणाम तुझ्या मानवतेवरच्या श्रद्धेला ही प्रणाम तवपूर्वी जरी बहु निपजले
असतीलही हया धरतीने 
तुझ्या कृतीतून तू निर्मियली 
त्या भारतीय घटनेला ही प्रणाम !!
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home