Saturday, 12 June 2021

माणूस प्रवृत्ती

असाच कधीतरी विचारांमागे 
धावतो माणूस
आधीच्या गुंतागुतीला आणखी वळणे 
देतो माणूस
विचारांच्या वलयांवर कधी स्वार होऊन 
उंचच उंच शिखरे पार 
करतो माणूस
तर कधी ह्याच वलयांच्या अधीन होऊन
रसातळाला 
जातो माणूस 
माणसाची जातच न्यारी
दऱ्या कपारी झाडे शिखरे 
नद्या सरोवर सागर लहरी
दिवस रात्र संध्येच्या प्रहरी
रंगां मधून उतरवितो माणूस
कधी आतंकित भयगंडाने, 
क्रूरपणे ही जगतो माणूस 
कधी सूर ते स्वर लहरींचे
कधी अचानक मौन वैखरी
स्नेह, द्वेष ही क्षणांत बदली 
स्तब्धांदोलित, शून्य पणाने
क्षण क्षण विरळा असतो माणूस
क्षण क्षण अगम्य असतो माणूस
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home