Sunday, 13 June 2021

अश्वत्थाम्या थांब

अश्वत्थाम्या थांब
असा भटकू नकोस 
या सृष्टीला अंत नाही, 
आणि,
तुझ्या शापित जीवनालाही अंत नाही 
अंत नाही म्हणून कां कुणी
जिवाची वणवण करावी ? नाही! नाही!! कदापि नाही
कदापि नाही कारण 
शापित जरी तुझे जीवन तरिही
तू ही जगनियंत्याचांच अंश 
तुला अमर ठेवण्यामागे 
नक्कीच असेल कांही कारण
 कारणा शिवाय जन्म नाही 
कर्तृत्व नाही,
दोष नाही, मृत्यु नाही 
कोण जाणे पुन्हा एकदां 
घडेल येथे
महाभारताचे राजकारण 
पुन्दा जन्मावे लागतील 
तुझ्या सारखे शूर योद्धे
किंवा, 
कदाचित् सूच होशील सूत्रधार
आणि देशील पृथ्वीच्या गतीचक्राला
नवे रूप नवे आकार
तेव्हा थांब! जरा विसाव अन्
येणाऱ्या काळाची प्रतिक्षा कर 
येणाऱ्या काळाची प्रतिक्षा कर
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home