Saturday, 12 June 2021

'अ' शिक्षण

काळ, काम आणि वेग 
शाळेत शिकत असताना 
सोडवलीत काम व वेगाची गणिते
काळाचं गणित मला जमलंच नाही
पश्चिमेकडे धावणाऱ्या सूर्याला पाहूनही प्रकाशांचं गम्य 'मला कळलंच नाही
पूर्वेच्या दिशेला झाली वाटचाल  अंधाराशिवाय पदरी कांही पडलंच नाही 
कधी प्रसन्न, स्वच्छंद आनंदी
जगणं वाटयाला आलंच नाही 
स्नेही म्हणती गड्या
काळाला तुझं कांही भावलंच नाही
सत्य पाहता माझ्या मते
काळ कुणाचा नाही, कुणाचाच नाही 
काळाने कुणाशी जमवून घेतलंच नाही
काळाने कुणाशी जमवून घेतलंच नाही
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home