Saturday, 12 June 2021

शून्य

जातोय मित्रा ?
होय, जायलाच हवं
 नियतीच्या इच्छेला अनुसरून जायलाच हवं
कुणी, कुठे, कसा, कधी 
अंतापासून अंतापर्यंतचीच सारी वाटचाल शून्यातून निर्माण होवून 
शून्यातच संपणारी सारी हालचाल आकृतिबंधाचे नियम सृष्टीस मान्य नसतात
रोज नवं घडते आहे, रोज जुनं मोडते आहे
कालच्या व्याख्या पुसून,
 नवे सिधांत जन्म घेतच आहेत. 
अविष्कारांचे डोलारे, पुन्हा राखरांगोळी 
सारं घडतेच आहे.
सगळीकडे अनिश्चित सर्व कही
 शाश्वत असं कांहीच नाही
थांबू कसा?
मी धांबू कसा ? सांग, मी थांबू कसा
मल जायलाच हवं, नियतीच्या नेमाने जायलाच हवं
हळवा होवू नकोस, दु:ख करू नकोस 
तू तरी कसा थांबू शकशील ? 
माझ्या आणि तुझ्या शून्यातील अंतर 
कदाचित अनभिज्ञ असेलही
तरी तुलाही शून्यातून बाहेर पडून
शून्याकडे जायलाच हवं.... जायलाच हवं
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home