Saturday, 12 June 2021

ध्यास

जग हे वेड्यांचे भांडार 
जग हे वेडयांचे भांडार
कुणी वेडा स्वार्धा करिता कुणी वेडा ठार ||धृ 
वेड घेवुनी कुणी जगतसे 
ध्येय तयांना कांही नसे
कुणी हो वेडा ध्येय साधण्या 
मनीं त्याच्या अंगार ..............१
लोभास्वत होवोनी वेडा
जीव घेतसे कुणी कुणाचा
प्राक्तनी त्याच्या फाशी येता
रडतो मानुनी हार ................२
एक होतसे धर्माचा वेडा 
जागोजागी करी बखेडा
पेटवुनी गल्ल्या वस्त्यांना 
सुखे झोपतो पार ................३
जग हे वेड्यांचे भंडार 
कवि 'रवि'


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home