सारथ्य
मी आताशा एकटाच हिंडतोय
होंडक्या, एकटया, रेल्वे इंजिना सारखा
इथून तिथे, अन्, तिथून इथे
समक्ष येते हे दृष्य
तेंव्हा
मनात कालवाकालव होते !!
होंडके, एकटे इंजिन,
कधी कुणाला आवडेल कां
खुद्द इंजिलाला तरी,
हे असं धावणं साहवेल कां
इंजिनाचा वसा निराळा
सतत भार पेलवून अपार धावण्याचा
धावताना कधीही चाकोरी न सोडण्याचा
मग ओझे नसल्यागत धावणं
इंजिन कसं सहन करील ?
तरिही धावतेय
न अडखळता न थांबता
नव्या आशा, नव्या दिशा,
नवा भार अंगावर घेण्यासाठी
नव्या युगाच्या नव कल्पनांना मार्गस्थ
करण्यासाठी
इंजिना ! चाकोरी सोडू नकोस
घेतला वसा टाकू नकोस
धावत रहा, मीही धावेन
तुझ्या सारखा
तुझ्या अंतरातील उर्मी घेवून
तुझ्या जाणिवा अंगी बाणून
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home