मनाच्या प्रवृत्ती
रंगले हे विश्व,
जर कां कधी मन रंगले
भंगल्या दाही दिशा,
जर हे कधी मन भंगले
मन मानवाची उर्मी स्कूर्ति
मन चालना मनची गती
मन उच्च आदर्शास प्रसवे
मनची ती फिरवी मती
मन ज्या क्षणी इच्छा बदलते
वाल्मिकी जन्मास येतो
मन क्षुब्ध होते त्या क्षणी
प्रस्थापितांचा ऱ्हास होतो
रे मना मजला कधी
मोहात तू पाडू नको
तृप्त या हृदयांत माझ्या
मद मत्सरा धाडू नको
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home