Saturday, 12 June 2021

प्रतिक्षा

पलीकडच्या फलाटावर
अचानक चमकली 
ती तूच होतीस कां
धावत्या गर्दीतही 
स्पष्ट उमटली
ती तूच होतीस कां
दृष्टी वर आतां 
भरवसा उरला नाही
स्पंदनातून जाणवली 
ती तूच होतीस कां
फलारावरील खांबासारखा
स्तब्ध झालो मी
पुन्हा हुलकावून जाणारी 
ती तूच होतीस कां
पटणार नाही तुला पण कां कोण जाणे अजूनही वेड्यागत स्थिती आहे
पलीकडच्याच फलटावर तरी
पुन्हा एकदा येशील कां 
पुन्हा एकदां येशील कां
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home